रौरव :
रौरव म्हणजे बाह्य सृष्टीत सतत डिमांड आणि कंम्लेंट करीत राहणे थोडक्यात रडत राहणे. पाताळ व नरक म्हणजे बाह्य दृष्टी आणि बाह्य सृष्टीतील माया यावर प्रेम मोहामुळे राग राग करीत राहणे. अश्याने आपली आहे ती देहबोली, शरीरप्रकृती, शरीरयष्टी, शरीरबांधा तसेच मानसिक आरोग्य बिघडते. दुःखदायक, वेदनादायक मरण येते. पुर्नजन्म व सुड याचे चक्र चालू राहते. रौरव ही जीवात्म्याची प्राथमिक अटळ अवस्था आहे.
भैरव :
भैरव म्हणजे सरस्वतिने दिलेले नॉलेज प्रत्यक्षात टॅन्जी बल स्वरूपात म्हणजेच वस्तुरूपात उतरवण्यासाठी मेहनत करणे. अँक्चुअली सरस्वतिचे नॉलेज मशीनरी किंवा बायो मशिनरी बनविण्यासाठी नसून स्वतःचे ज्ञान, विज्ञान वाढवून, स्वतःच्या साधनेने पंचकोष शरीर देहापासून मुक्ती मिळविण्यासाठी आहे. त्याच्यात फसण्यासाठी नाही. भैरवाकडून शारीरीक रोग तसेच व्यसने लावून कामे करवून घेतली जातात. मेहनतीचा पुरेसा मोबदला दिला जात नाही. शारीरीक मानसिक रोगावर औषध मलमपट्टी दवादारुचे केवळ पाकीट मारायचे नाटक माया करते पण त्याने भैरवा कडून केवळ जास्तीचे काम करवून घेतले जाते.
अश्याने पश्चाताप, फसगत झाल्याची भावना, हसे झाल्याची भावना, मानसिक व मनोशारीरीक रोग लागतात. भैरवाला दुर्गा गौरी देवीकडून सतत मरण मिळते. भैरवाला नॉर्मल जीवन जगणे तसेच समाजात मिसळणे कठीण होवून जाते. भैरवाला सतत ध्यान समाधितच स्थिर रहावे लागते. भैरव ही जीवात्म्याची उच्चमाध्यमिक अवस्था आहे.
रौरव आणि भैरव तत्वाच्या दुःखद चक्रव्युहामध्ये फसण्यापेक्षा ' हरेराम हरेराम रामराम हरेहरे हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्णकृष्ण हरेहरे ' किंवा ' विठ्ठल विठ्ठल ' असा जप करीत मनाला ' ऑल इज वेल ' असे समजावत कंट्रोलमध्ये ठेवून , संतुलीत व प्रसन्न ठेवत कायद्याने काम करीत राहीलो तरी तुम्हाला एखादे गोड हलवाईचा सन्माननिय ब्रॅड मिळू शकतो.
जीवात्म्याचे मरण आणि स्थित्यांतरे सतत चालूच असतात.
रौरवाला भैरवाकडून तर भैरवाला गौरवाकडून मरण मिळते.
गौरव समजण्यासाठी प्रथम गोविंद समजणे आवश्यक आहे.
गोविंद :
ग म्हणजे अनंत ईनफिनिटीचे ज्ञान ! ज्यात पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह दोन्ही ईनफिनिटी शामिल आहेत.
अ म्हणजे दिव्य व मुलभूत अत्तर अक्षर अमृत तत्व इ.
मूळ आधार !
उ म्हणजे मूळ आधाराशी असलेले असोसिएशन !
ग + उ = गौ ! जे सर्व सृष्टीची जननी तसेच उर्जा स्रोत आहे. तसेच प्रथमगुरुस्थान किवा मातृस्थान आहे.
गउ म्हणजे गणतत्वाशी असोसिएशन !
गौ अवस्थेशी जीवात्मा संलग्न असतांना देखील गौ च्या
' रज किंवा रव ' स्थितीला टाळून सांभाळून राहावे लागते. म्हणून म्हणतात की, घराबाहेरच्या गाईला पूर्वेने म्हणजे शिंग असलेल्या पुढील बाजूने सामोरी जावू नये. तर पश्चीमेकडून म्हणजे शेपटी असलेल्या बाजूने म्हणजेच गउ ला सरस्वतियुक्त संगित भजन गायनाने मनाला आनंद तसेच सुकून वाटेल अशा पद्धतिने अप्रत्यक्षरित्या प्रसन्न करावे. किवा तिच्या पासून दूरच रहावे.
गउ तत्वामध्ये जेव्हा दिव्य अमृत तत्वाचा साक्षात्कार होतो. म्हणजे मूळ अक्षर ' अ ' याची दिव्यता गउ शी संलग्न होते तेव्हा गोविंद तत्वाची निर्मिती होते.
ग + अ + उ = गौ = गोविंद ! जे सर्व सृष्टीचा पिता शीवशंकर तसेच शक्तीस्रोत आहे. तसेच गुरुस्थान आहे. पांडुरग, शंकर, राम, कृष्ण, हरि, बालाजी, केशवा, विठ्ठल, विठोबा, साईबाबा, सनकादिकुमार, नंदी हे सर्व त्याचेच स्वरूप आहेत.
त्याचप्रमाणे, गोविंदअवस्था ही अत्यंत जबाबदारीची आणि सहनशील, समंजस, राहण्याची अवस्था आहे ! यात आपले दुःख पूर्ण विसरून केवळ सर्वांचे म्हणणे प्रतिक्रिया न देता ऐकून घेणे व सान्त्वन आशीर्वाद शब्दच फक्त बोलत राहावे लागते. कारण, थोडीशी चुकसुद्धा जीवात्म्याला गोविंदतत्वापासून विलग करू शकते ज्यामुळे पुन्हा पुन्हा रौरव व भैरव या क्लेशपिडादायक अवस्थेतून जीवात्म्याला जावे लागते. गोविंद ही जीवात्म्याची डॉक्टरेट कुलगुरू अवस्था आहे. जी आपले जीवनच बदलून टाकते. दिव्यतेशी जोपर्यंत संबंध प्रस्थापित आहे तोपर्यंत ही अवस्था टिकून राहते.
( अल्टर )
रेवणनाथ :
र म्हणजे जीवनशक्तीस्रोत !
व म्हणजे अंतर्मन !
र + व = रव = रेवणनाथ !
जे सृष्टीचे संचालन व शक्तीस्त्रोत आहे. गणेश हनुमंत सृष्टी संचालनामध्ये रेवणनाथांना सपोर्ट करतात. रेवणनाथ ही जीवात्म्याची कुलपती पदवीअवस्था आहे. ( कंट्रोल ) ज्ञानाची बुद्धीची आणि सृष्टी हलवण्याची ताकद जोपर्यंत प्रस्थापित आहे तोपर्यंत ही अवस्था टिकून राहते.
गौरव :
गौ + रव = गौरव.
गोविंद आणि रेवणनाथ यांचे मिलनातून गौरव तयार होतो.
गौरव म्हणजे बाह्यसृष्टीत डिमांड तसेच कंम्लेंड न करणे.
मिळालेल्या सरस्वतिच्या ज्ञानाचा वापर करून सरळ सरळ स्वतःच्या गुणांचा विकास करणे. स्वतःसाठी ज्ञान, मोक्ष, मुक्ती, आरोग्य, विसडम, संरक्षण, अमृत इ. इ. मिळवून घेणे. बाह्य सृष्टीचा तसेच इतर प्रियजनांना विचारही न करणे. अशाप्रकारे गौरव इतरांना भाव देत नाही त्यामुळे त्याचा भाव वाढतच जातो. इतरांकडून आदर्श मानला जातो व त्याचा गुणगौरव समारंभ होतच राहतो. त्याचे मरेपर्यंत आरोग्य चांगले राहते. त्याला मरेपर्यंत गौ गोविंद हनुमंत गणेश यांचे संरक्षण कवच राहते.
गणनाथ :
गण हा ज्ञानाचा मुलभूत कण म्हणजे गॉड पार्टीकल आहे. ज्यात संपूर्ण ज्ञान सामावलेले आहे.
गणगौरवनाथ :
गण + गौरव + नाथ = गणगौरवनाथ !
हे संपूर्ण सृष्टीरुपी शरीराचे ( श्री ) स्वामीसमर्थ आहेत.
गणगौरवनाथ भैरवनाथाला, रौरवनाथाला सहजरित्या मारतात. गणगौरवनाथ ही जीवात्म्याची डिलीट ( डॉक्टर ऑफ लिटरेचर म्हणजे नरसिंह सरस्वति ) पदवी अवस्था आहे. ( डिलीट )
गोविंद (अल्टर), रेवण (कंट्रोल), आणि गणगौरव (डिलीट) या तिन्हींचा वापर करून (संगणक जसा अल्टर, कंट्रोल, डिलीट बटन वापरून लॉक होतो त्याप्रमाणे) सूर्य व पृथ्वीवर अधिकार प्राप्त होतो.
गोविंद तत्व आणि रेवण तत्व यांचा अन्योन्य परस्पर संबंध :
नवनारायण किंवा नवनाथ जे सृष्टी जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहेत, त्यापैकी एक आहे, रेवणनाथ !
रावण या शब्दाच्या अगदी जवळ रेवण हा शब्द जातो.
कावळ्याला पण इंग्लीशमध्ये रेवण असे म्हणतात.
कावळ्याचा रंग काळा असतो. त्याची नजर नेहमी घाणीवर तसेच मेलेल्या मांसाच्या गोळ्यावर असते.
आपल्या शरीरातील आतड्यात अन्न हे मेलेल्या मांसासारखे असते. आतडे ते पचवितात. त्याप्रमाणे बाह्य सृष्टीतील परिसरातील मेलेल्या प्राण्याचे मांस कावळे पचवितात.
आपल्याला भुक लागते तेव्हा पोटात कावळे कोकलतात असे म्हणतात. म्हणजे शरीराची भुक, जठराग्नी, क्रेव्हईंग, कामाग्नी हे सर्व रेवण या संज्ञेशी सबंधीत आहेत.मानसिक आणि शारीरीक तृष्णेची शांति करण्यासाठी करण्यात येणारी पार्टीला रेव पार्टी हे नाव यामुळेच देण्यात आलेले आहे.
कउरव हा शब्द देखील कावळ्याची आणि रेवण तत्वाची आठवण करून देणारा आहे. रावणाचा शत्रु राम आहे. राम जप करणारा कमी खातो पण जास्त शक्तीशाली राहतो. राम जप करणारा स्त्री मोहात फसत नाही, तसेच दहा विकारातही फसत नाही, त्यामुळे त्याची शक्ती उर्जा व्यर्थ वाया जात नाही. असा लोकांचा अनुभव आहे.
रव ह्या तत्वामुळे बॉडी कॉन्शिअसनेस बळावतो. शरीरात तामसिकता बळावते. तसेच बॉडी कॉन्शिअसनेस हा सोल नॉलेज, सोल पावर, सोल कॉन्सिअसनेससाठी अडथळा असतो. गणगोविंदतत्वात गुण्यागोविंदाने टिकून राहण्यासाठी रवतत्व जवळ जवळ नाहीसे होणे गरजेचे असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा