कम अँण्ड गो थिअरी ऑफ राम


क म्हणजे स्वतःची पर्सनल कामना !
कम म्हणजे स्वतःची पर्सनल कामना मारून टाकणे !

जेव्हा आपण अनंत म्हणजे ईनफिनीटीचे ज्ञान घेत घेत थकून जातो आणि ज्ञानाची कामना तृप्तच होत नाही हे कळल्यावर आपण आपली पर्सनल कामना मारून टाकतो. म्हणजे पूर्णपणे खाली होतो. शांत, प्रसन्न होतो. तेव्हा आपण ' कं ' लेव्हलवर असतो. तेव्हा रामप्रभु आपल्याला कम म्हणून त्यांच्या मंदीरात (कॅबिनमध्ये) बोलावतात. 

राग राग करत सृष्टीचा विस्तार होवून गेलेला आहे. तो राग आता मावळावा. राग मरावा. म्हणून राम हा शब्द आहे. राम या शब्दाला ' रां ' असे जर लिहीले, तर तुम्हाला उच्चार करतांना लक्षात येईल की, आपण प्रभुंचे नाव घेतांना शेवटी ' अ ' या अदृश्य पदावर जास्त भर देतो. ज्यामुळे आपला उच्चार पूर्ण तर होतोच, पण उच्चाराचे समाधानही तेव्हाच मिळते. म्हणून, प्रभुचे नाव ' रांअ ' असे आहे. तिथे काळ थांबलेला असतो. आणि दिव्यत्व बहरलेले असते.

रामतत्वात शांती समाधान प्रसन्नता प्रेरणा उत्साह मिळविल्यानंतर जेव्हा काळ पुन्हा सुरु होतो. काळाच्या भानामुळे आपल्याला ' गो ' अश्या उच्चाराची (स्पेलची) आज्ञा मिळते. आणि आपण राम प्रभूंच्या मंदीरातून (कॅबिनमधून) नवीन प्रोजेक्ट हाताशी घेवून उत्साहाने बाहेर पडतो.

ग म्हणजे अनंत (ईनफिनीटीचे) ज्ञान !
ओ ( ॐ) म्हणजे बोलावणे, हाक देणे.
अशाप्रकारे गो म्हणत आपण ज्ञान गोळा करत असतो.

राम मंदीराच्या बाहेर पडल्यावर, बाह्य जगतातील वासनामय कामुक जनावरांमध्ये, प्रभुंचा ' गोविंद ' जपच आता आपल्याला सांभाळणार असतो.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

अई !

विठ्ठलपंतांनी आपल्या अपत्यांची नावे आध्यात्मिक विकास क्रमाने दिलेली होती. प्रत्येक अपत्याच्या नावामध्ये सनातन ज्ञान भरलेले होते. ' मुक्...

एकूण पृष्ठदृश्ये :