भक्ताभिमानी गुरुमहाराज

मानवी शरीर ही सरस्वतिचीच गहन कलाकृती आहे आणि सरस्वतिचा संदेश देखील ! 

श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थांच्या फोटोत बघाल तर डाव्या खांद्याचे महत्व अधोरेखीत केलेले आहे. मुळ फोटोत डावा खांदा उजव्या खांद्यापेक्षा उंच आहे. डावा खांदा ताकदवान झाला असेल तर अन्न मिळते, लग्न होण्यास, नोकरी लागण्यास व नोकरी टिकण्यास मदत होते. सिता ही रामाचा वामअंग आहे ! तुमची जीवनाची डावी बाजू बळकट करण्यासाठी श्रीस्वामी समर्थांकडे जा ! त्यांची सेवा करा !


श्री साई समर्थ
श्रीसाई समर्थ फोटोत बघाल तर उजव्या खांद्याचे महत्व अधोरेखीत केलेले आहे. मूळ फोटोत उजवा खांदा डाव्या खांद्यापेक्षा उंच आहे. उजवा खांदा बळकट झाला की उत्पन्न वाढीस मदत होते. वस्त्र मिळते. बळ मिळते. श्रीराम हे सितेपेक्षा उजवे आहेत. तुमची जीवनाची उजवी बाजू बळकट करण्यासाठी श्रीसाई समर्थांकडे जा ! त्यांची सेवा करा !


श्री शीव समर्थ
शंकर महाराजांच्या फोटोत बघाल तर दोन्ही गुढगे, पाय, बोटे हे विशेष रुपाने प्रदर्शीत होतात म्हणजे त्यांना शक्ती दिली गेलेली आहे. त्यांना अधोरेखित केलेले आहे. पायाचे गुढगे, हातापायाची बोटे बळकट असतील तर आत्मनिर्भरतेच्या गुढ ज्ञानाच्या किल्ल्या मिळण्यास मदत होते. स्वतःचे घर निवारा मिळतो. तुमच्या जीवनातील अलौकीक बाजू बळकट करण्यासाठी शंकर महाराजांकडे जा ! त्यांची सेवा करा.
श्रद्धा, सबुरी, प्रेम, शांति, निर्विकारी, निरंकारी, निर्लेप राहणाऱ्या सर्व सत्शिष्यासाठी गुरु महाराज सदैव तत्परच असतात.
' नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ' याचा अर्थ असा आहे की, तुम्ही रामाची उपेक्षा करू नका ! कारण राम आपल्या दासा चा म्हणजे भक्ताचा अभिमानच बाळगतो. श्री स्वामी समर्थांच्या जयजयकारात देखील स्वामींना
' भक्तवत्सल, भक्ताभिमानी ' असेच संबोधीले जाते.

जय गुरुदेव दत्त
जेव्हा जगातील / विश्वातील अनेकोअनेक नाथमहाराज एकमेकांशी विविध विषयावर भांडू लागले आणि प्रलयंकारी युद्ध करू लागले तेंव्हा त्यांना शांत करण्यासाठी अत्रीसुत दत्त प्रकट झाले, जे सर्व नाथमहाराजांचे दिव्यप्रभु आहेत. 
मानवी शरीरे हे तामसिक पंचतत्वे असणार्या इंद्रियांपासून बनलेले असतात. जेव्हा दोन तमस ( त ) सतत एकमेकांशी घासले जातात. तेव्हा त्यांना पवित्र करणारा अग्नी ( अ ) निर्माण होतो. त्याप्रमाणे ' अ ' या अक्षराचे दिव्यत्व आहे. दत्त म्हणजे सर्व दिव्यत्वाचे मूळ उगम म्हणजे ' अ ' देणारा ! 
सर्व अक्षरांचा उगम ' अ ' या मूळाक्षरापासूनच झालेला आहे. आणि प्रत्येक अक्षरामध्ये ' अ ' हा स्वर अध्यारूत असतोच ! 
त्याचप्रकारे सर्व नाथ महाराजांमध्ये जे मूळ दिव्यत्व आहे ते श्रीगुरुदेव दत्ताकडूनच आलेले आहे म्हणून त्यांना अप्रभु सुद्धा म्हणतात. अवगुण जाळून टाकतात. पापे धुवून टाकतात. म्हणून त्यांना ' अवधुत ' असेही म्हटले जाते.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

अई !

विठ्ठलपंतांनी आपल्या अपत्यांची नावे आध्यात्मिक विकास क्रमाने दिलेली होती. प्रत्येक अपत्याच्या नावामध्ये सनातन ज्ञान भरलेले होते. ' मुक्...

एकूण पृष्ठदृश्ये :