आयुष्याचा वड जर आत्मनिर्भर स्वसंरक्षित आणि स्वतंत्र मुक्त करायचा असेल तर आपल्या आयुष्याच्या दोन गोष्टी बळकट असणे फार आवश्यक आहे.
त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा आयुष्याच्या वडाचा मुळाचा आधार म्हणजे मुळा नदी ! तुमच्या आयुष्याची मुळानदी स्वच्छ निर्मळ आणि बलशाली असणे आवश्यक आहे.
तुमच्या आयुष्याच्या वडाचे मूळ (आधार ) म्हणजे
श्री स्वामी समर्थ यांची सेवा !
आणि
त्या मुळाच्या दरवाजावर श्री स्वामी समर्थांची सेवा करीत सरस्वति आणि लक्ष्मी घेवून बसलेला आहे, श्रीगणेश !
तुमचे आयुष्याचे मूळ बळकट करण्यासाठी रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा जप आणि तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे वाचन नियमितपणे करणे आवश्यक आहे.
याने तुमचे मूळ स्वच्छ निर्मळ आणि बळकट राहील !
दुसरी गोष्ट आहे, आयुष्याच्या वडाची मूठ !
ही मूठ जी आहे, ती तुम्हाला स्वातंत्र्य आत्मनिर्भरता स्वसंरक्षण मिळवून देणारी आहे !
तर ही मूठ म्हणजे श्रीरामचंद्र यांचा आशीर्वाद !
आणि श्रीरामचंद्र यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्या दरवाजावर त्यांची सेवा करीत बसला आहे श्री हनुमंत ! ही मूठ बळकट करण्यासाठी श्री रामचंद्रांचा जप दिवसभर करत राहणे आवश्यक आहे.
दिवसाचा ११ माळी श्रीस्वामी समर्थ जप आणि ३ अध्याय सारामृत वाचन केल्यावर नंतर दिवसरात्र आपण कामधंदा करत असतांना श्री रामचंद्रांचा जप नियमितपणे करणे आवश्यक आहे. कारण ही तुमची मूठ बळकट करेन ! आणि मुठी मध्ये तुमचे चारीपाची बोट जे असणारच आहे तर ते पण बळकटच होतील !
डॉलर कारची डॉली डोळ्यासमोर उभी राहीली तर उभ्या उभ्या तुमच्या मनाची ' हरिभरी - बॅटरी ', तुमच्या डोक्याचे ' रूपी - डिझेल ' आणि डोळ्याचे ' पैसा - पेट्रोल ' खेचून घेते व जातांना मनात हळहळ, डोळ्यात धुर आणि डोक्यात आग सोडून जाते.
विचार करा की, आपले भारतीय मन, डोके व डोळे केवळ लोकांच्या गाड्या चार्ज करण्यासाठी आहेत का ?
आपला भारतीय ' रूपी ' फक्त लोकांचे डॉलर आणि डॉलीचा भाव वाढविण्यासाठी आहे का ? याने कोणत्या भारतीय उपजावू जमिनीचा विकास होणार ?? की विदेशी बर्फाचा विकास होणार ??
भारतीय बाळाचा विकास, आई आणि गाईम्हशीचे दुध पिवून होतो. डॉलर बाईला चार्ज करून होत नाही. त्याने उलट बाळाच्या पप्पांना रोग आणि व्यसने लागतात.
भारतीय बाळासाठी दुध त्याच्या जन्मदात्या आईलाच येते, डॉलर बाईला भारतीय बाळासाठी दुध येणे शक्य नाही.
आईचे दुध अंगी लागते आणि वाढीसाठी आवश्यक असते. कामवाली बाईचे नाही.
आज भारतीय बाळाला डॉलर बाईच्या मनोरंजनापेक्षा स्वतःच्या आईचे दुध पिवून धष्टपुष्ट होणे जास्त गरजेचे आहे.
डॉलरचा भाव वाढवाल तर इथे सेक्स वाढेल !
रूपीचा भाव वाढवाल तर ईथला सेन्सेक्स वाढेल !
विचार करा, सेक्स वाढवून ठेवला तर रहायला जमिन अलरेडी नाही !
जी जमिन आहे ती उपजावू नाही.
आपण आता ह्या वयात मासेमारी करायला आणि जगावरील उपजावू जमिनींवर कब्जा करण्यासाठी मिलिटरी एज्युकेशन शिकायचे का?
भारतीय रूपी पैसे कमी पडतात म्हणून आपल्याच बाळाला ठोकणार की ठेल्याला लावणार ?
लक्षात घ्या की, तुमची मूठ बळकट असल्याशिवाय तुम्ही स्वतःच्याच शरीर व प्रॉपर्टीरूपी लंकेवर सुद्धा विजय मिळवू शकत नाही !
आणि
तुमची शरीर आणि प्रॉपर्टीरूपी लंका साधी निरोगी सुद्धा ठेवू शकणारच नाही. तसेच तुम्ही कधीही स्वतःची आत्मनिर्भरताही मिळू शकत नाही !
त्यामुळे तुमची मूठ ही स्वच्छ पवित्र तर असावीच पण अत्यंत ताकदवान असावी !
ज्या वेळेला हनुमानजी लंकेत प्रवेश करत असताना लंकीनीने त्यांना अडवले तेव्हा हीच बळकट मूठ त्या लंकीणीला मारून हनुमानजींनी आत्मनिर्भरतेची प्रतिष्ठापना सर्वप्रथम केली आहे आणि त्यातून दर्शवून दिले आहे की, आपली मूठ बळकट असल्याशिवाय तुम्हाला स्वातंत्र्य मिळवणे हे कठीणच काय पण अशक्य आहे.
तुमची मुठानदी ही बळकट करण्यासाठी श्रीरामचंद्रांचा जप सतत काम करीत असताना करत राहणे हे अत्यंत आवश्यक बाब आहे ! नाहीतर वेगवेगळ्या युक्तीने तुमच्या गाई, गादी, किल्या, पाकीटे सतत मारले जातील.
मुळा आणि मुठा ह्या दोन नद्या तुमच्या आयुष्याचा वड भरभराट तर करतीलच सोबत तुम्हाला मुक्ती स्वातंत्र्य रूपी आत्मनिर्भरता मिळवून देतील !
आणि ज्या शिवरायांनी पुण्यभुमीतल्या या मुळा-मुठा नद्यांचे संरक्षण केले त्यांना कोटी कोटी वंदन !
# आत्मनिर्भर भारताच्या जडांगात दम आणि मनगटात ताकद तेव्हाच राहते जेव्हा आपल्या मुळामुठा नद्या प्रकाशवान हवेशीर निर्मळ पाणीदार ( म्हणजेच प्रदुषणमुक्त ) आणि ताकदवान असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा