बाह्यजग हे, ' टा ' म्हणजे, टोपी घालणाऱ्यांचे, आणि ' टी ' म्हणजे, त्या टोपीला सपोर्ट देणाऱ्यांचे आहे. हे नोकरीचा अनुभव घेवून लक्षात आल्यावर, आपल्या ' ढा ' म्हणजे, शरीराच्या गुढ एनर्जीला, आणि, आपल्या ' डा ' म्हणजे, शरीराच्या चैतन्याला, लोकांच्या ' टोप्या ' प्रेस करण्यामध्ये न घालवता, कोणत्यातरी उच्चउत्तमोत्तम कार्यात इनव्हेस्ट करायला हवे, असे मला वाटू लागले.
' नोकरीत हंस बनून, मोती खावून, नंतर ते मोती उगाळत बसण्यापेक्षा, विठ्ठल नामाचा गजर करत, हसत खेळत किर्तन करण्याची वेळ आता आलेली आहे.' असा काळ ईशारा करू लागला होता !
नोकरीच्या टाटीला ' टाटा ' करण्याची वेळ आता आलेली आहे ! हे मला लक्षात येऊ लागले होते.
' डा ' म्हणजे, आपल्या बॉडीचे चैतन्य !
नोकरीचा ' घो ' म्हणजे, नवरा बनुन, आपण आपले ' डा ' व्यर्थ का घालवावे ?
त्याऐवजी, आपण ' गो ' म्हणजे, आपल्या ज्ञानाच्या शक्तीचा वापर करून, बाह्यजगात आत्मनिर्भर का होऊ नये ? असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला.
' हाजमौला ' गोळी खाऊन, जर ' खाया - पिया - पचाया और बस हो गया ! ' एवढेच होणार असेल, तर आपण ' हाजगौला ' या नावाने नवीन गोळी बनऊन, ' खाया-पिया-पचाया, हागा-मुता-धोया, बोया और नयाभी उगाया ! ' यापर्यंत मजल का नेऊ नये ? असा विचार माझ्या मनाला हलवून गेला............
एवढेच नव्हे तर, इतर बिझीनेस परसनच्या, अशाप्रकारच्या नवनवीन बिझीनेस आयडियांचा देखील, मी सन्मान करू लागलो होतो.
नोकऱ्या करणारे कर्मचारी लोक पार्ट्या करून एकत्र जेवतात !
बिझनेसमॅन लोक मात्र, लोकांच्या जेवणाच्या पार्ट्या ॲरेन्ज करून, एकत्र रस पिवून का हसत असतात ? असा प्रश्न नेहमी मला पडायचा. त्याचा उलगडा होण्याची प्रक्रिया हळूहळू मनात सुरु झालेली होती ......
Disclaimer Note : As a author, I respect everybody, whether it may be a worker, employee or business person. Please treat this post as a sarcastic article for weekend entertainment purpose only. Thanks !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा