पुण्याच्या पर्वतीवरील, देवदेवेश्वर मंदिराच्या लगत असलेल्या, विष्णुनारायण मंदिरात बोर्डवर विष्णुचे एक नाव ' शगपच ' असे लिहीलेले आहे.
आंतरीक सनातनज्ञान ( ग ),
आंतरिकदृष्टी ( प ),
आंतरिक इंटेलिजेन्स ( च ) ,
हे सर्व ध्यानसमाधी ( जय ) ,
म्हणजे, आपल्या पुण्यतिथीतून निर्माण झालेले असतात.
जेव्हा हे सर्व नष्ट होतात ( श ) ,
तेव्हा जयअंत ( म्हणजे, ध्यानसमाधीचा अंत ) होतो.
म्हणजे, आत्म्यामध्ये देहभावनेचा जन्म होतो.
देहधारी जगतात कर्तव्यकर्म करतांना " आपल्या हातात जेवढे होते, तेवढे आम्ही केले, बाकी ईश्वर ईच्छा ! " असे आपण जनरली म्हणत असतो.
विष्णु शरीराचा पालक आहे. विष्णुच्या मुर्तीच्या हाताच्या तळव्यावर गोलाकार फुलाची प्रतिमा असते. ' करमध्ये तु गोविंदा ' याची ती आठवण करून देणारी खुण आहे. शरीराचे जे सजीव इंजिन ( कर ) आहे. त्यामध्ये सनातनज्ञान जाणणाऱ्या गोविंदाचा निवास आहे. आपल्या हातात जेवढे आहे, तेवढे तरी करा ! देहधारी व्यक्तींनी त्या गोविंदाचा जप करा. असा याचा अर्थ होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा