गोड माया टाळा !


संसारी वनव्यात आणि रॅटरेसमध्ये भागून दवडून थकून आलेल्या जीवाला, जेव्हा कोणी गोडमायेने कुरवाळून देते. तेव्हा त्याला त्या गोडमायेमध्ये देव दिसायला लागतो. असेच काही आमच्या दोन मुंगेरीलालच्या मुलांच्या बाबतीत घडले. 

एका मुंगेरीलालला गोळ्यांची चटक लागली. तर दुसऱ्या मुंगेरीलालला गोड साखरेची चटक लागली.

देवीच्या हातात उस का असतो ? असे जेव्हा प्रश्न करत्याने गुरुदेवांना विचारले होते, तेव्हा गुरुदेव म्हटले होते की, देवी ही आपल्या शिष्याला गोड उसाचा मोह दाखवून, शेवटी त्याला ठार मारते.

आता अशी काही घटना वास्तविक जगात घडली आहे का ? हे मी शोधू लागलो. तेव्हा मला ह्या मुंगेरीलालचा किस्सा आठवू लागला. 

एका मुंगेरीलालला पतंग उडवायची फार सवय होती. आणि पतंग उडवायच्या कॉम्पिटिशनमध्ये गोळी खाऊन विशेष फायदा होतो, हे त्याला एका डॉक्टरने समजावले. त्यामुळे मुंगेरीलालने गोळी खाल्ली आणि आपला परफॉर्मन्स सुधावला.

पतंग स्पर्धा आगीच्या वनव्यासारखी वाढत होती. मुंगेरीलाल आपली क्षमता वाढवण्यासाठी विचार करू लागला. आणि त्याने गोळी खाण्याची जी मात्रा होती, ती वाढवली. आणि एक वेळ अशी आली, की त्याने इतक्या सार्‍या गोळ्या खाऊन घेतल्या. की तो मुंगेरीलाल स्वतःच घारीलाल होऊन गेला. आणि आकाशात उडाला. पण असा उडाला की, परत त्याला कधी जमिनीवर येताच आले नाही. त्याचे परत येण्याचे सर्व इंधन संपलेले होते. आणि कोणीही त्याला परत येण्यासाठी इंधन पुरवत नव्हते. चढविण्यासाठी मात्र डॉक्टरासह सर्वांनी मदत केली होती. त्याच्या परत येण्याच्या ' विल ' ला यम लागला !

मुंगी उडाली आकाशी, घार झाली.
पण परत  जमिनीवर कधीच नाही आली !


दुसरा मुंगेरीलाल महामायागुरुचा भक्त होता. त्याला त्याच्या महागुरुने सल्ला दिला की, तु मुंगी बनून साखर खा ! तेव्हा मुंगेरीलालने आपल्या गुरुची आज्ञा शिरोधार्य मानून, इतकी काही साखर खाल्ली की, त्याचे ओठच सोलावले गेले, परत कधीही न बरे होण्यासाठी !

" ऊस डोंगा परी, रस नाही डोंगा ! 
ओठ सोलटाऊन, बसलाय बांगा ! " 

योगमाया ही देखील एक गोडमाया आहे. तिच्यात देखील जास्त मस्ती करायचा प्रयत्न करू नये !

एक कहानी तुम्हाला सांगावीशी वाटते. ती म्हणजे, बुट्याकाळ ' राजु ' कुत्र्याची !

राजू कुत्र्याला त्याच्या राजाने आपल्या राज्यातील समस्येविषयी अवगत केले. 
आपल्या राज्यात लोक खाऊन रस्त्यावर हागतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. 
आणि आपल्या राज्याचे सौंदर्य नष्ट होऊन, आपल्या राज्याची हवा दुर्गंधी झालेली आहे.

राजू कुत्र्याला या आधी कधी न केलेले नवीनच प्रकारचे काम अलॉट झालेले होते. 
राज दरबारी नोकरी असल्याने, सर्व प्रकारची मोकळीक आणि अधिकार राजू कुत्र्याला प्राप्त झालेले होते. अशावेळी, राजू कुत्रा आपल्या राजाशी इमान ठेवणार आणि आपल्या राजाने दिलेले कार्य पूर्ण करणारच ! अशी सर्वांनाच, आणि स्वतः राजूला देखील खात्री होती.

राजू कुत्र्याने काही दिवस रस्त्यावर लोकांचा उकिरडा साफ करण्याचा प्रयत्न केला. अनेकविध कामगार माणसं लावून लोकांचा उकिरडा रोज साफ केला. परंतु, ते परत परत उकिरडा करत आहेत. खात आणि हागत आहेत. त्यामुळे मेहनत करून परत परत उकिरडा उचलणे, राजू कुत्र्याला दमछाक करणारे झाले. अशावेळी, राजू कुत्र्याचे टाळके सणकले होते. त्यामुळे, राजू कुत्र्याने सरळ त्या हागऱ्या लोकांनाच ठार मारून टाकले. ठार मारल्यावर सर्व प्रजाजन जे घाण करीत होते, ते राजू कुत्र्याच्या पोटात गेले. आणि पोटातील त्यांच्या खाण्या आणि हागण्याच्या सवयीची भुतबाधा, स्वतः राजू कुत्र्याला झाली व राजू कुत्राच राज्यात सर्वत्र आपली हागणदारी वाढवू लागला. 
राजा समोरचा प्रश्न " पुनश्च हागपाद " कायम राहीला.
किलींग आणि क्लिनिंग या दोन शब्दातील फरक, त्याला एवढा मोठा झाल्यावर देखील समजला नसल्याने, हा ' धचामा घोळ ' झालेला आहे. असे त्याच्या वकीलांचे म्हणणे आहे.

अजून एक कहानी तुम्हाला सांगावीशी वाटते. ती म्हणजे, 
राजचड्डीसेवक  'अभि जात बूच ' या लंबुनाट्यसम्राटाची !

' अभी जात बुच ' नावाचा लंबुनाट्यसम्राट चहाराणीची आज्ञा पाळून, जगभर पसरतील असे श्रीमंत ड्रामे बनवून, ज्ञानी लोकांच्या ज्ञानाला बुच लावण्याचे काम करायचा. त्यामुळे, ज्ञानी लोकांना मुक्तीच्या मार्गात अडथळा निर्माण होत होता. तरीदेखील ज्ञानी लोकांनी या राजचड्डी सेवकाला क्षमा केली. मात्र राजचड्डीसेवक अभिजातबुचाची , ' बुच लावण्याची सवय ', हाच त्याचा पैसा आणि मान देणारा ' एकमेव प्रोफेशन ' बनला होता. 

जेव्हा हा अभीजातबुच, स्वतः वयाने ऐंशी वर्षाचा म्हातारा झाला, आणि त्याच्याबरोबरचे सर्व सवंगडी देवाघरी गेले. तेव्हा या ' अभी जात बुच ' व्यक्तीला स्वतः मुक्त होता आले नाही. त्याच्या मुक्तीला देखील बुच लागले. एवढेच नाही, तर त्याच्या उच्च दर्जाच्या वंशाला देखील बूच लागले. सर्व देवाघरी सुखाने गेले. हा मात्र त्याच्या " मेरे अंगने में बुच लगाने कोई काम है ? " असे गाणे तो म्हणत नवीन काम शोधू लागला. दुसऱ्यासाठी खड्डा खणणारा, स्वतःच खड्डयात पडतो. त्याप्रमाणे, दुसऱ्याला बुच लावणाऱ्यालाच, देव बुच लावून देतो !

तळटीप :
उत्तर ध्रुवावर उत्तर शोधायला गेलेल्या माझ्या प्रिय भारतीय शास्त्रज्ञांना ' ट्रिपल ओ ' असलेल्या ओझोनचा पुरवठा व्हावा. आणि त्यांच्या रॉकेटवरील ' ट्रिपल एक्स ' चे गुदमरण देणारे कवच गळून पडावे. ह्या प्रांजळ उद्दिष्टाने मला ही कथा सुचली आहे. मी प्रोफेशनली पैसे आणि सत्कार कमावणारा लेखक नाही. कथालेखनातील आणि व्याकरणातील चुकभुल क्षमा असावी. दुसऱ्यांच्या चुकांतून धडा घेवून, स्वतःची मुक्ती साधावी.

डिस्क्लेमर : सदर गोष्ट पूर्णपणे काल्पनिक कथा असून,  त्याचा चालू काळातील संदर्भ निव्वळ योगायोग समजावा. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

लाईफचे ईनपुट आणि आऊटपुट !

लाईफ म्हणजे काय ? ते कसे बनलेले आहे ? लाईफ म्हणजे, जीवन ! लाईफ या शब्दातील, ला म्हणजे, अल्लाह ! ई म्हणजे, ईलाही ! फ म्हणजे, गोविंदा !...

एकूण पृष्ठदृश्ये :