विठ्ठलाच्या कानाला मासे लावलेले दाखवतात.
त्याचा अर्थ असा आहे की, विठ्ठल हा देहधारी नाही. मात्र सर्व देहधारी जीव हे हाडामासापासून बनलेले आहेत.
मात्र विठ्ठल हा केवळ चैतन्यस्वरूप आहे.
त्या चैतन्याचे ध्यान आपल्याला करता यावे. यासाठी स्पिरिच्युअल शास्त्रज्ञांनी विठ्ठलाला सगुणरूपात किंवा मूर्तीत कन्व्हर्ट करून, त्यावर ध्यान करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात मात्र खरे पाहता, विठ्ठल हे पुर्ण जागृत चैतन्यस्वरूप आहे. हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे.
या चैतन्याचा प्रत्येक देह असलेल्या, देहधारी जिवाला ध्यास असतो. कारण, चैतन्याशिवाय तुम्ही देह चालवू शकत नाहीत. तुमच्यात बळ असणं, शक्ती असणं, बुद्धी असणं, विसडम-अक्कल असणं, जाणीव असणं. या सर्व गोष्टी तुम्हाला चैतन्याकडून प्राप्त होतात.
मासा हे देहधारी जीवाचे, सजीव प्राण्याचे रूप आहे.
मासा हे देहधारी जीवाचे, सजीव प्राण्याचे रूप आहे.
प्रत्येक सजीव प्राणी, जो अंगावर कातडी एवढे जरी मास बाळगत असला, तरी त्या व्यक्तीला, त्या मानवाला, किंवा त्या सजीवाला, मासा म्हणावे लागेल आणि त्या माशाचे कनेक्शन ( म्हणजेच, योग ), विठ्ठलाशी असल्यामुळेच, त्याच्यामध्ये जीवन जगण्यासाठी, अत्यावश्यक, चैतन्य त्याच्याकडे आहे. हे आपण नीट समजून घेतले पाहिजे.
ओंकारूपी गणपतीसमोर, कालभैरव उंदीराएवढा दिसतो.
त्याप्रमाणे, चैतन्यरूपी विठ्ठलापुढे, ' मोठ्यातला मोठा सजीव ' माश्याएवढा दिसतो.
असे स्पिरिच्युअल शास्त्रज्ञांना फोटो किंवा मुर्तीतून दर्शवायचे असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा