प्रॅक्टीकल विज्ञान भैरव !



गुरुत्वाकर्षणावर अजूनपर्यंत कोणालाही पूर्णपणे तोड काढता आलेली नाही. 
लोकांनी अँटीग्रॅव्हिटी असलेले विमान - उपग्रह देखील बनवून बघितले, तरीदेखील त्यांना ग्रॅव्हिटीला इग्नोर करता आलेले नाही. 
हा आजपर्यंतचा प्रत्यक्ष पाहिलेला आणि अनुभवलेला इतिहास आहे.

आज आपण डिस्कस करणार आहोत, न्यूटनच्या नियमांचे प्रॅक्टिकल जीवनातील उदाहरणे !

न्यूटनचा पहिला नियम म्हणतो..........

पण नाही, मी आज ते तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगणार नाही ! 
आज मी तुम्हाला अतिशय साध्या मराठी भाषेत आणि व्यावहारिक भाषेत ह्या गोष्टी सांगणार आहे. कारण आय बी लॉंग टू यु ! म्हणजे, मी तुमचे देणे घेणे लागतो. आणि हितगुज करतांना विचित्र वेगळ्या भाषेत सांगितलेले ज्ञान किंवा दाखविला चित्रपट डोक्यावरून जातो. आणि डोक्यावरच्या गेलेल्या गोष्टी दाखवून, केवळ तुमचे पाकीट मारायचे काम,  तुमच्या स्वच्छ डोळ्याच्या बाहुल्या नाचवायचे काम, सिनेमे असो, वा पुस्तके असो, करतात. व असे हीनकृत्य करून आपल्याला स्वतःला काय मुक्ती मिळणार आहे ? कारण, न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार, जर आपण दुसऱ्यांचे पाकीट मारू, तर दुसरे देखील आपले पाकीट मारतील. आणि आपण काही देहरहित झालेलो नाहीत, त्यामुळे नको ते क्लेम करून, स्वतःची प्रसिद्धी करून, अति शहाणपणा करून, आपला बैल रिकामा मला करून घ्यायचा नाही.

न्युटनचा पहिला नियम म्हणतो की, तुमच्यावर बाहेरील शक्तीने बळजबरी केली जाते. 

आता हा नियम आहे. 
बस तो समजून घ्यायचा असतो. 
निसर्गाचे नियम म्हणजे, तुम्हाला आगीचा चटका लागणार आहे. 
आता, मी जर तुम्हाला असा हा नियम सांगितला की, आगीचा चटका लागतो. तर तुम्ही तो फक्त समजून घ्याल. बरोबर !

आणि मग आता चटका लागणारच आहे, तर काहीतरी उपाय शोधाल. तर त्याचप्रमाणे तुमच्यावर बळजबरी केली जाते. असे जर मी सांगितले, तर ताबडतोब तुम्ही स्वतःची शक्ती कमी आहे. किंवा स्वतःच ज्ञान कमी आहे. हे स्वतःहून समजून घ्याल ! आणि स्वतःची शक्ती आणि स्वतःचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न कराल !

ठीक आहे  ना !
आता न्यूटनचा दुसरा नियम हा आहे की, रस्त्यावरील समोर असलेल्या जड गाडीमुळे तुम्हाला तुमची हलकी आणि छोटी असलेली गाडी पुढे काढता येत नाही. 
म्हणजेच, ट्राफिक जाम झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये समोरील जडधड असलेली गाडी जर समजा हळूहळू चालत असेल. तर तुमचा सुद्धा ट्राफिक मध्ये कोंडमारा होईल. तुम्हाला पुढून आणि मागून बुचन लागलेलं आहे. तुमचा टाईम, तुमचा आयुष्य, तुमचा वेळ, सगळं काही कुरतडून घेतलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल ? तुम्हाला तुमच्या गणतव्यापासून रोखून ठेवलेलं आहे. हा तो मुद्दा आहे. 

तुम्हाला बुच्चन लावले जाते, हा न्यूटनचा व्यावहारिक दुसरा नियम आहे.
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल ? एक तर हॉर्न वाजवून, शिंगे मारून, तोफ मारून ते बुच्चन ओपन करण्याचा प्रयत्न कराल. किंवा तिथे बॉम्बस्फोट करून, ते बुच्चन उघडायचा प्रयत्न कराल. किंवा स्वतःच हेलीकॉटर-विमान डेव्हलप करून, तुम्ही ट्राफिकमधुन बाहेर निघून जाल आणि यासाठी परत तुम्हाला न्यूटनच्या पहिला नियमाची खबरदारी घ्यावी लागेल. म्हणजे, तुम्ही तुमचे ज्ञान, शक्ती, ताकद सगळं वाढवलेले असेल, तेव्हा तुम्ही कुठे तुमची ट्रॅफिक जाम मधून सुटका करू शकाल. नाहीतर, समोरील जड गाडी तुमच्यावर परत बळजबरी करणारच आहे. म्हणजे, तुम्हाला जड बनवून जडत्वामध्ये गाडून ठेवणार आहे !

न्यूटनचा तिसरा नियम काय म्हणतो, की जर तुम्ही ह्या जड गाडीला ठोकून विकून बघितले. तर, ती जड गाडी उलट तुम्हाला देखील ठोकेन !

म्हणजे, तुमच्यावर परत अन्याय झाला ! कारण, तुम्ही ॲक्शन केली. त्याला त्या जड गाडीने रिएक्शन दिली.
एखादा व्यक्ती, समजा रणगाड्यासारखा वाढलेला असेल. आणि न खातापिता केवळ तो गोळे सोडत असेल. 
काम न करता, केवळ खाऊन पिऊन तो गोळे सोडत असेल. तर लोक तो रणगाडा बॉर्डरवर ठेवतात. निदान तिथे तरी तो कामात येईल. 

लोक पण फार चतुर असतात. प्रत्येकाला कामाला लावतात. पण कामाला जड लोकांनाच लावलं जातं. ज्याला सगळं ज्ञान येऊन गेले आहे, तो राम शोधतो, काम नाही. कारण, काम करून करून त्याला लक्षात आलेले असते की, ही न संपणारी प्रक्रिया आहे. 

आता ज्याला राम मिळाला, तो सुटकेचा प्रयत्न करायला लागतो. पण त्याच्यावरच अन्याय सुरू होतो. 
म्हणजे, त्याच्या प्रत्येक ॲक्शनवर रिएक्शन यायला लागते. कारण, हे सर्वजण प्राणी आहेत. 

तुमच्यावर  तशी पाळी आली. अशी वेळ जर समजा आली, तर अशावेळी तुम्ही काय कराल ? 
स्वतःला सुरवंटासारखे कोशामध्ये गुंडाळून घ्याल. किंवा स्वतःचे शिरस्राण कवच तयार कराल. कारण की, तुम्ही तलवारीने वार केल्यावर समोरचा देखील तलवारीने वार करेल. त्यामुळे एका हातात ढाल देखील ठेवावी लागते. त्याप्रमाणे तुम्ही तुमचे ढाली, संरक्षण कवच, बंकर  बनवाल ! असा हा न्यूटनचा तिसरा नियम, प्रॅक्टिकल जीवनात क्षणोक्षणी, पदोपदी जाणवणारा आहे.

न्यूटनचे तीन नियम शिकून आणि खेळून झाल्यावर, आईन्स्टाईनने एनर्जी डेव्हलप करण्याचा विचार केला. 
आणि ओंकाराची साधना करून, त्याने जड गोष्टींना ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट करण्याचा नियम शोधून काढला. 
जोरजोराने रेल्वे, विमाने धावू लागले. पण सोबत अणुबॉम्ब स्पोट सुद्धा होऊ लागले. त्यामुळे, अलर्टनेस अजूनच जास्त वाढला. 

अनेक प्रकारचे स्पर्धा आणि युद्ध सुरू झाले. वर्ल्ड वॉर वन टू थ्री फोर सुरू झाले. 
कारण की, काही अतिप्रगत लोग होते. तर काही नुकतेच जन्मलेले किंवा नुकतेच पास आऊट झालेले अर्धवट ज्ञानी होते. आणि असे अनेक प्रकारचे कोणी जड शरीराचे, तर कोणी हलके योगी शरीराचे होते. असा जगाचा ड्रामा होता. आणि मग त्याच्यातून परत अंधअपंग दिव्यांग पैदा करून ठेवले.

आईन्स्टाईननंतर देखील अनेक शास्त्रज्ञ आले. उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. 
त्यापैकी प्रॅक्टिकल उपाय म्हणजे, अन्नदान करणे.
भाजी करणे. कुकर वापरणे ! 

तर भाजी बनवणे सुरू झाले. हॉकिन्सचा कुकर आला. पण स्वतः हॉकीन्स बिचारा, ना बोलू शके, ना चालू शके ! केवळ त्याच्या ' ब्रेन्स वेव ' टॅप करून सृष्टीचक्रावर काही उपाय सापडतो का ? असा शोध सुरू झालेला होता.
स्टिफनचे ज्ञान इतके जास्त होते की, ते विकले देखील जाईना ! कारण, घरदार नसलेल्या पब्लीकला, उच्च दर्जाचे ज्ञान सांगून, पब्लीक मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमीट होवू लागली.

" स्टीफन खूप जास्त ज्ञान सांगतो.  पण, ते आपल्याला अन्नासारखे सहजरीत्या पचनी पडत नाही." आणि " त्या ज्ञानाला आईनस्तईनच्या ज्ञानासारखे, ' कॅश ' देखील करता येत नाही."  त्यामुळे, हांडे, होंडे लोकांनी, स्टीफनला बुच लावून, त्याला कुकर बनवून, स्वयंपाक घरात कामाला पाठवले. स्वयंपाक घरात देखील, अग्नीवर बसून, जेव्हा तो ध्यान करीत असे. आणि ध्यानाद्वारे आपल्या शास्त्रज्ञांना संदेश पाठवीत असे. 

शास्त्रज्ञलोक, आजचा महिना संपून, आपली सॅलरी कधी आपल्या हातात येईल ? 
याबाबत, डायनिंग टेबलवर, ' विचार विनिमय करणारी मीटिंग ' करत होते. तेव्हा त्यांच्या लॅपटॉपवर प्रकट होत हॉकिन्सने सांगितले की, " आता तुम्ही जेवण कराल. आणि मग खूप सारे हागाल. " " तेव्हा अनेक वराह अवतार जन्म घेऊन, ती जमीनी वरील घाण साफ करणार आहेत. " असे शेवटचे वाक्य उच्चारून, हॉकीन्सने शेवटची शिटी मारून आपला प्राण सोडला.

पुस्तके लिहून, चित्रपटे बनवून, पुतळे स्मारके उभारून, कच्चे लिंबू, कच्चे आंबे, आणि कच्चे अंडे उबवून, त्यांना पक्के लिंबू, पक्के आंबे, आणि पक्के फणस बनवण्याचा काही लोकांनी ध्यास घेतला होता. त्यासाठी, ह्या उबवण्याच्या प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा देखील एक विशेष रोल होता.

आरक्षण लोकांनी घेतले. पण त्यानंतर स्वतःवर आलेली जबाबदारी पेलवू शकले नाहीत. ज्ञान त्यांना झेपले नाही. फक्त वस्तू गोळा करून ठेवल्या. पुस्तके गोळा करून ठेवले. बाया माणसं गोळा करून ठेवल्या. ज्यांचा मेंटेनन्स करायला आणि ज्यांना खावू घालायला खर्च येतो. असे तर अनेक निगेटिव्ह बाबी आहेत. सिस्टीम, उद्योग नावाची गँग बनवून, संघटीतपणे हांडे - होंडे लोक देवाच्या पैश्यावर बलात्कार करू लागले. फुकटात प्राप्त झालेले किंवा ढापलेले पैसे, लोक मार्केटमध्ये फिरवू लागले आणि येड्याचे सोंग घेवून बाहुला-बाहूली स्टाईल मारू लागले.

आजकाल अनेक लोकांकडे जमिनी आहेत. मोठमोठे शरीरे आहेत. आणि ते ताब्यात घेऊन बसलेले आहेत. आरक्षण देखील घेऊन बसलेले आहेत. आणि हेच म्हणत आहेत की, जे सगळ्यांचे होईल, ते आपले होईल. आणि बाहेरून रेडीमेड आपल्याला प्रभु राम, पुष्पक विमान घ्यायला येणार आहे. किंवा भगवान श्रीहरी आपल्याला गरुड घेऊन आपल्याला घ्यायला येणार आहे ! तोपर्यंत आपण ' नाचू कीर्तनाचे रंगी ' करत राहू.

नाचूया, गाऊया आणि आनंदी राहूया. 
वेगवेगळी चालखीने वेगवेगळ्या गोष्टींचे ' फॅशन शो ' करूया !
मग त्या नाचांमध्ये देखील स्पर्धा होऊ लागली.
" नाचो, नाचो,  नाचोन चुना चुना चुना चुना " !
तर अशाप्रकारे, " नाचू चा चुना " होवून गेला. 
आता इतका चुना लावला गेलेला आहे की, लोकांची जीभ फाटून गेली. 
नवीन नवीन पीके येऊन रिमोटशोध धिंगाणा सुरु झाला. 

चक्रीचे न संपणारे करामतीज्ञान बघून लोक परत डिप्रेशनमध्ये जायला लागली किंवा तब्येती खराब करायला लागली. त्यामुळे, परत " आ गया, आ गया, हलवा - वाला, आ गया ! धूम मचाने आ गया ! प्यार जताने आ गया ! " असे म्हणत हलवा-वाला येत राहतो. तर कधी बासरी-वाला येऊन नागोबा लोकांना घेऊन जातो. तर, कधी पिंगांनी-वाला माकडांना घेऊन जातो. अशाप्रकारे ' स्वच्छता अभियान ' ही प्रक्रिया देखील नियमितपणे पृथ्वीवर चालू आहे.

पैसा, संपत्ती आणि आरोग्य गोळा करून ठेवलेल्या लोकांना, जर काम नसेल, तर निदान त्यांना हलवा करण्याचे तरी ज्ञान पाहिजे ! किंवा त्यांनी आपले अंग असे हलवावे, जेणेकरून वारा शुद्ध राहील, पाणी शुद्ध राहील, म्हणून कर्म गीतेचे गीतगात क्रिया-वाला नियमितपणे येत असतो.

मेणबत्ती आली, आणि प्रकाश देऊन गेली. 
मुती आली, आणि गरम विटेला शांत करून गेली. 
मौत आली, आणि विठ्ठलाला तुळशी देऊन गेली. 
अशाप्रकारे, जन्मापासून मरणापर्यंत उपयोगी ठरणाऱ्या ज्ञानविज्ञान भैरवाला नमस्कार असो !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

भीक आणि भिऊ !

भीक म्हणजे काय ? ' ई ' म्हणजे, ऊर्जा . ऊर्जेचे अनेक प्रकार माणसाने बनवलेले आहेत. त्यापैकी ज्या ऊर्जा पॉझिटिव्ह आहेत, पोषक आहेत, उत...

एकूण पृष्ठदृश्ये :