असाध्य अडचणींवरील उपाय

असाध्य अडचणींवरील उपाय : आरती आणि ध्यान करणे !

हाताबाहेरच्या गोष्टी म्हणजे, आपल्या क्षमतेच्या बाहेर असलेल्या गोष्टी ! ज्या आपल्या जिवनात घटना घडवीत आहेत. त्यामुळे त्यांना प्रार्थना करून प्रसन्न केल्याशिवाय, आपल्या जिवनातील अडचणी - दुःखवेदना दूर होत नाहीत. अशावेळी आर्ततेने मनापासून केलेल्या प्रार्थनेला पर्याय नाही. त्यालाच आरती करणे म्हणतात.

काही अडचणी अशा आहेत की, ज्या आपण मेल्याशिवाय सुटत नाहीत. आपण मरणे, हाच त्या अडचणींवरील उपाय असतो. मेडीकेशन खात, स्वतःवर कर्ज चढवून मेल्यापेक्षा, हेल्थी राहून, मेडिटेशन करत, स्वतःहून मेलेले चांगले असते. यालाच स्वतःहून समाधी ध्यान करणे म्हणतात.

भारतात लोक आपापल्या घरी रोज नियमितपणे सकाळी आर्धातास आणि संध्याकाळी आर्धातास आरती प्रार्थना करतात व दिवसातून किमान दोनदोन तास मेडीटेशन करतात. आरती आणि ध्यान आपल्या रुटीन लाईफचा अविभाज्य घटक त्यांनी बनवून घेतलेला आहे. 

आध्यात्मिक विकासापुढे, ' मटेरिअल विकास ' हा अमृत सोडून भंगार गोळा करण्यासारखे आहे. ईडापिडा देणारा आहे. आपली ईडापिडा टळो, यासाठी ईडापिडा गोळा करणाऱ्या लोकांची संगती टळणे आवश्यक असते. मग ते लोक आपले अत्यंत जवळचे नातेवाईक का असेनात !
सिन्सिअरपणे आरती आणि ध्यान करणाऱ्या व्यक्तीचा आध्यात्मिक विकास होतो. जो आत्मनिर्भरतेचा मुख्यपाया आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

नाना का मॅट्रीक्स !

मायाजाळाची व्याख्या करणे शक्य आहे का ?  कधीही पूर्णपणे ताब्यात न येणारे, कधीही पूर्णपणे न संपणारे, ' मायाजाळ ' हे लोकांना सतत नित्यन...

एकूण पृष्ठदृश्ये :