झाडाला नवीन पाने येणे. ही झाडाच्या वाढीची आणि झडाच्या पानांच्या पेशी प्रजननाची प्रक्रिया आहे. आपल्या शरीरातल्या प्रजनन संस्था या प्रजनन प्रक्रियेतील पेशींचे पुनरुत्पादन यामध्ये सहाय्य करीत असतात.
डव साबणाने आपण आपले जेनिटल्स आणि इंटिमेट ऑर्गन्स धुतो. ही झाली स्वच्छतेची प्रक्रिया, हायजिन ! आपल्या शरीरात क्लिनिंग करणाऱ्या काही पेशी असतात. जसे आपले मुत्राशय आहे, किडनी, ॲनस आहे. या सगळ्या स्वच्छतेच्या आणि डायजेशनच्या गोष्टी करण्यासाठी मोठी ताकद लागते. आपले गुदव्दार, आपले आतडे, एवढेच काय आपली त्वचा देखील शरीर स्वच्छतेच्या कामांमध्ये सहभागी असते. म्हणजे काय, तर हे सगळे पांडव कॅटेगिरीचे ऑर्गन्स आहेत. पांडव कॅटेगिरीचे पेशी आहे. स्वच्छता करणे किंवा प्रजनन करणे याच्यासाठी हायर पोटेन्शिअल आणि हायर पावरची गरज असते. ती पांडवांमध्ये असते.
रव किंवा रवा हे शरीर भरणाऱ्या, खाण्याशी संबंधित गोष्ट आहे. रव्याचा शिरा आपण खातो. रेवणनाथांना अन्नदान करायची आवड होती. म्हणजे, अन्न खाणे, शरीर वाढविणे या संदर्भात जे ऑर्गन्स शरीराला मदत करतात. उदाहरणार्थ, आपले तोंड, जे अन्न खाण्यास मदत करते. नाक, तोंड, कान, आपले स्पर्श इंद्रिय संदर्भात आणि इंटेक्स संदर्भात असलेले ऑर्गन्स आहेत. शरीरात ग्रहण आणि साठवणूक करण्याची प्रक्रिया यामध्ये सहाय्य करणाऱ्या त्यांना कौरव कॅटेगिरीचे पेशी म्हणता येईल. कारण ते इंटेक्सशी जास्त संदर्भहीत आहेत. क्लीनिंग आणि डायजेशनशी त्यांचा कमी संबंध आहे.
अशाप्रकारे, कौरव आणि पांडव हे दोन्हीही विश्व शरीराचे भाग आहेत. परंतु, ज्या वेळेला त्यांच्यामध्ये कॅन्सरसारखे बॅलन्स बिघडवणारे गोष्टी होतात. त्या वेळेला विश्व शरीराचा मालक स्वतः महाभारत घडवून आणून, अतिरिक्त पेशींचा नायनाट करत असतो. त्यामुळे, आपला लोभ, आपला मोह, आपली मायाममता यापेक्षा देखील विश्वशरीराचे आरोग्य अधिक महत्त्वाचे मानले गेलेले आहे. कारण, जोपर्यंत विश्वशरीर तंदुरुस्त होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला, आहे त्या वस्तूचा देखील, सुखाने उपभोग घेता येणार नाही. किंवा जीवन आनंदाने जगता येणार नाही.
शरीरात जर कमकुवत व बुढ्या झालेल्या पेशी आहेत, जे काम करू शकत नाही, चांगले परफॉर्म करू शकत नाही, त्यांचे विकार वाढलेले असतात. अहंकारामुळे, ते विश्व शरीराशी बगावत करू पाहतात. त्यामुळे, रामायण करून त्यांचा नाश केला जातो. ज्या पेशी खावुन खावुन कॅन्सर सारख्या वाढल्या आहेत. ज्यांना स्वतःच्या इंद्रियांवर कंट्रोल राहिलेला नाही, त्यांचा महाभारत घालून नायनाट केला जातो. अशाप्रकारे विश्व शरीराचे आरोग्य, रामायण आणि महाभारत या बृहदक्रिया करून निरोगी राखले जात असते. एका समंजस ध्यानी योगीला ह्या गोष्टी लगेच समजतात. आणि तो स्व-तत्वात लवकर स्थिर होत असतो. आणि त्याचा विश्व शरीराशी सहजरीत्या योग जुळत असतो. कौरवपेशी आणि पांडवपेशी याव्यतिरिक्त, नियमित ध्यान करणाऱ्या काही अशादेखील पेशी असतात. की, ज्यांना संपूर्ण विश्वशरीराचे डिझाईन नॉलेज असते. त्यांना ऋषीपेशी, मुनीपेशी तसेच, गुरुपेशी असे म्हणतात.
दान करणारे जेव्हा दानाचे लिमिट क्रॉस करतात म्हणजे, परत बॅलन्स बिघडवतात. तेव्हा त्यांना दानवपेशी कॅटॅगिरी मानुन नष्ट केले जाते. दैत्यपेशी कॅटॅगिरी ही पेशी खावून जाणारी सफाई कॅटॅगिरी आहे. पण ती देखील पेशी खाण्याचे लिमिट क्रॉस करू लागली की, विश्वशरीराला त्रासदायक ठरते. राक्षस ही स्वतःचे आरोग्य अतीउत्तम ठेवणारी, स्वतःला नेहमी बलशाली ठेवणारी पेशी कॅटॅगिरी आहे. मात्र ही राक्षसपेशी कॅटॅगिरी, जर विश्वशरीराशी योग जुळवून कार्य करीत नसेल, तर मारावी लागते.
' महाभारत ' हा फार मोठा आणि सेन्सिटीव्ह विषय आहे. भारतात जन्म झालेल्या प्रत्येकाला नकळत हा विषय आभ्यासावा लागतो. त्यामुळे, आज आपण त्यातील कौरव आणि पांडव ह्या ज्या दोन मुख्य सेन्सिटिव्ह ' संज्ञा ' ज्या आहेत. त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कौरव आणि पांडव हे दोन शब्द आहेत. यांचा अर्थ काय आहे ? हे समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात.
' क ' म्हणजे, इनफायनाइट सृष्टीचक्र ! आणि त्या इनफायनाइट सृष्टीचक्राशी असोसिएट झालेले जीव म्हणजे, ' कउ ' !
मनाने आणि जीवनाने सृष्टीचक्राशी असोसिएट झालेले जीव म्हणजे, ' कौरव ' असे म्हणता येईल. म्हणजेच, सृष्टीला आणि मायाचक्राला फॉलो करणारे लोक !
सृष्टीला ' रुक्मिणी ' असे देखील म्हणतात. सृष्टीला ' महालक्ष्मी ' असे देखील म्हणतात. सृष्टीला ' नारायणी ' असे देखील म्हणतात.
सृष्टीला ' कृष्णदेवराई ' किंवा ' देवराई ' किंवा नुसतेच ' राई ' असे देखील म्हणतात. सृष्टीला ' मोहरी ' असे देखील म्हणतात. कारण ती जीवनात मोह निर्माण करणारी मनमोहक आहे.
सृष्टीला ' राई ' असे देखील म्हणतात. तर या राईची आज्ञा पाळणारे जे लोक आहेत, राईला फॉलो करणारे जे लोक आहेत, ते ' कौरव ' या संज्ञेमध्ये फिट बसतात. आपण आपल्याला समजण्यासाठी त्यांना ' ओबेराई ' असे नाव देऊया !
आता आपण ' पांडव ' या संज्ञेबाबत विचारविनिमय करूया.
सृष्टीला जन्म देणारा, सृष्टीचे पालनपोषण करणारा आणि सृष्टीची पुनर्निर्मिती करणारा गॉड आपल्याला दैहीक चक्षुंनी कधीही दिसणार नाही. त्यामुळे त्याला समजून घेण्यासाठी योग्याभ्यास करून ध्यान करणे हाच एक उपाय आहे.
' अंड ' हे सृष्टीचे फिजिकल स्वरूप जर मानले, तर ध्यानातून ऊर्जा निर्मिती करून, सृष्टी चालवणारे जे लोक आहेत, त्यांना ' पांडव ' असे म्हणता येईल. म्हणजे, सृष्टी जर अंड असेल, तर त्या अंड्यामध्ये जीव घालणारे जे लोक आहेत. त्या अंड्यामध्ये ताकद निर्माण करणारे जे लोक आहेत. ' डव ' साबणासारखे स्वतः झिजून, त्या अंडयाला स्वच्छ करून, धुणारे जे लोक आहेत. त्यांना ' पांडव ' असे म्हणता येईल. अंडयाला जन्म देणे, वाढवणे, आणि ते अंडे खराब झाल्यावर ते अंडे नष्ट करणे. ह्या क्रिया म्हणजे, जनरेटर - ऑपरेटर आणि डिस्ट्रॉयरच्या क्रिया आहेत. यालाच ' गॉड ' असे म्हणतात. तर या क्रिया करणारे जे लोक आहेत किंवा गॉडच्या ह्या क्रियांना सपोर्ट करणारे जे लोक आहेत, ते ' पांडव ' आहेत !
म्हणजे, कौरव आणि पांडव याच्यामध्ये छोटासा फरक आहे.
कौरव ' सृष्टीला ' फॉलो करतात.
परंतु पांडव हे सृष्टीला जनरेट, ऑपरेट आणि डिस्ट्रॉय करतात. म्हणजे, ते ' सृष्टीकर्त्याला ' फॉलो करणारे आहेत.
कौरव हे ' सृष्टीला ' फॉलो करणारे आहेत.
म्हणून कौरव हे ' ओबेराई ' आहेत.
कौरव हे ' सृष्टीला ' फॉलो करणारे आहेत.
म्हणून कौरव हे ' ओबेराई ' आहेत.
पांडव हे ' ओबेराईवल्लभ ' आहेत. रामाला किंवा विठ्ठलाला ' राईचा वल्लभ ' असे म्हणतात. म्हणजे, सृष्टीचा नवरा ! सृष्टीच्या नवऱ्याला फॉलो करणारे ' पांडव ' आहेत. मात्र सृष्टीला फॉलो करणारे ' कौरव ' आहेत. अशाप्रकारे, ' ओबेराई ' आणि ' ओबेराईवल्लभ ' ह्या दोन संज्ञा तयार झालेल्या आहेत.
जर तुम्ही सृष्टीचा नवरा असाल, तरच तुम्हाला इतरांना दंड देण्याचा अधिकार आहे. नाहीतर तुम्ही न्यायसंहितेने वागणे अपेक्षीत आहे. शीवाजी महाराजांनी रयतेला आणि जगाला ' हर हर माँ देव ' हा संदेश दिला. म्हणजे, जर तुम्ही ध्यान करत नसाल, केवळ कर्म धर्म करत असाल, देहधारण करून, संसार करून, व्यापार व्यवहार करत असाल, तर तुम्ही पुरुष जरी दिसत असले, तरी तुम्ही ' माँ ' आहात. किंवा ' माँ ' देणारे ' माँ देव ' आहात. तुम्ही स्वतःला सृष्टीचा नवरा समजू नका ! ज्या दिवशी तुम्ही स्वतःला देहविरहीत करून दाखवाल. जेव्हा तुम्ही श्वास न घेता जगून दाखवाल. स्वतःला प्रकाशात कन्व्हर्ट करून दाखवाल. स्वतःला गायब करून दाखवाल. तेव्हाच तुम्ही खरे ' पांडव ' म्हणजे, सृष्टीच्या नवऱ्याचे एजंट किंवा पंचतत्व हॅण्डल करणारे पवित्र आत्मा आहात, हे सिद्ध होईल. तोपर्यंत तुम्ही केवळ स्व-आभ्यास, सेवा, साधना, सत्संग, भक्ती करणे योग्य आहे.
' यज्ञ ' म्हणजे, मुक्त आत्म्याला जाणून, त्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी केली जाणारी ' प्रक्रिया ' ! परमात्म्याला जाणून घेण्याचा प्रत्येक जीवाला हक्क आहे. यज्ञात अग्नीदेवाची सेवा केली जाते ! ज्ञान हे पवित्र करणारा अग्नी आहे. ज्ञान मिळविणे हा आपला हक्क आहे. त्याला ' अनल हक्क ' असे म्हणतात. ' दत्त ' गुरु हे अग्नीस्वरूप आहेत. घाण धुवून टाकणारे ' अवधुत ' आहेत. म्हणून आपण त्यांचे ' चिंतन ' करतो. ' दत्त ' हे ' श्रीपाद ' आहेत. शरीराकडे पाहणारा आत्मा (पांडुरंग) आहेत. ' दत्त ' हे ' श्रीवल्लभ ' देखील आहेत. शरीराचा नवरा, शरीराचा मालक (विठ्ठल) आहेत.
साईबाबांनी गॉड किंवा सृष्टीचा मालकाबाबत ' यादे हक्क ' असे म्हटले होते. म्हणजे, तुम्ही त्याची याद किंवा आठवण ठेवून कार्य करा ! त्याचे नाव जपण्याचा किंवा त्याचे ध्यान करण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे.
माझ्या वैयक्तिक मतानुसार, सृष्टी आपली आई आहे व सृष्टीकर्ता आपला बाप आहे. दोन्हीही आपल्याला प्रिय आहेत. आपण आपल्या शकती-क्षमतेनुसार दोन्हींची सेवा करण्यात तत्पर असतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला नवरा किंवा मालक समजू लागाल, त्या दिवसापासून महाभारत युद्ध सुरू होईल. त्यामुळे, तुम्ही स्वतःला मालक समजू नका ! स्वतःला सेवेकरी समजा ! पण सेवेची स्वतः जबाबदारी घेवूनच काम करा. हा महाभारत कथेपासून लक्षात आलेला निष्कर्ष आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा