पुढे जाऊन गुरुजी म्हणतात की, हे शरीर एका मोठ्या सटल बॉडीशी कनेक्टेड असते. त्याला आपण सोपे करून समजून घ्यायचे असेल, तर असे म्हणू शकतो की, ' सत आणि अल ' या दोन तत्त्वांपासून हे शरीर बनलेले असते. हिंदू धर्मांमध्ये सत्य नारायण असे म्हणतात. सत म्हणजे सत्य आणि अल म्हणजे नारायण ! तर सत्यनारायण हे आपल्या बॉडीचे विस्तृत स्वरूप आहे. त्याचा मान ठेवण्यासाठी, कमी बोलणे, गोड असेल तेवढे सत्य बोलणे. कटू असेल, तर मनात दाबून ठेवून ,डोळे मीचकाऊन, स्माईल करून, लोकांची क्षमा मागून, कटू सत्य न बोलणे. त्या ऐवजी नमस्कार करून घेणे. भक्ती मार्ग स्वीकारणे. अशा काही कौशल्याच्या गोष्टी अंगीकारणे. दान व्रत यासारख्या लौकिक कौशल्याच्या गोष्टी अंगीकारून, प्रसन्नचित्त राहण्याचा आणि सत्यनारायणाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणे. एकांती राहून मौन करणे. जेणेकरून आपल्या शारीरीक अस्तीत्वाचा इतरांना त्रास होणार नाही.
भजन, कीर्तन, सत्संग, साधना यांच्या वापर करून सत्यनारायण भगवानाला म्हणजेच, आपल्या सटल बॉडीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणे. व आपल्या देहाच्या मनोवांच्छित सुप्तइच्छा पूर्ण करून, देहाला प्रापंचिक सुख स्थैर्य शांती प्राप्त करून, ध्यानधारणा संयम करून, वडील व गुरु लोकांची सेवा करता करता, आत्मसाक्षात्कार प्राप्त करून, आत्मजागृती प्राप्त करून, स्वस्थ शरीर मनाबरोबर, स्वस्थ आत्मा प्राप्त करणे. व अशाप्रकारे शरीर आणि आत्मा दोन्हींची तृप्ती करून वैकुंठ गाठणे.
गुरुजी म्हणतात की, आपल्या आत्म्याला कधीही मारू नये, तर ध्यानाद्वारे आपल्या आत्म्याला परमात्म्याशी मिलन योग करवून द्यावा.
आपल्या देहाला मारू नये, तर देहाला यज्ञ योग भजन किर्तन सत्संग प्राणायाम आसन कर्मसाधना क्रियासाधना या सारख्या इतर अनेक आध्यक्तिक सेवेव्दारे आपल्या विस्तृत सत्यनारायण स्वरूपाची जाणीव करून द्यावी. आपल्या देहाला विस्तृत सत्यनारायणाच्या प्रसन्नतेसाठी उपयोगात आणणे शिकावे.
लौकीकदृष्टया किंवा व्यावहारिक प्रपंचाच्या दृष्टीने, आपण कितीही गरीब किंवा कितीही श्रीमंत असलो, किंवा कितीही ज्ञानी अथवा कितीही अज्ञानी असलो, तरी आपल्या देहाचे सत्य, आणि आपल्या आत्म्याचे पावित्र्य डावलून, आपण असत्याचा आणि अपावित्र्याचा अंगिकार करू नये. कारण असे केल्यास आपण आपल्या मुळ आधार सत्यनारायण स्वरूप असलेल्या, सत आणि अल धारणेला, स्वतःच्या सटल बॉडीला ईग्नोर करत स्वतःचे नुकसान करून घेत असतो.
खरे पाहता, सटल बॉडीखेरीज आपल्याला मदत करणारे दुसरे तिसरे जगात कोणीच नसते. त्यामुळे आपल्या सटल बॉडीशी मैत्री टिकवावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा