चंद्र आणि चद्दर !


गुरुलोक आपल्याला चतुरपणे जन्म देतात !
आपले लौकिक मातापिता आपल्याला भोळेपणाने जन्म देतात !
हा फरक आहे माता पिता आणि गुरु यामध्ये !

माता पिता यांना ' चंद्र ' असे म्हटले आहे.
चंद्र म्हणजे, ज्यांचा इंटेलिजन्स, किंवा बुद्धिमत्ता, किंवा चतुरपणा मारला गेलेला आहे. म्हणजे ते ' चं ' झालेले आहेत.  असे ' चं ' झालेले लोक, जेव्हा तुम्हाला लाईफ देतात. लाईफफोर्स एनर्जी देतात. तेव्हा त्यांना ' चंद्र ' असे म्हणतात !

मात्र गुरुलोक, तुम्हाला चतुरपणाने लाईफ-फोर्स देतात. म्हणून त्यांना ' चद्दर ' असे म्हणतात !

आपल्याकडे जो, जे देतो, त्याची सिम्बॉलिक गोष्ट, त्याला परत देण्याची प्रथा आहे.

गुरूंच्या समाधीवर चादर चढवली जाते, किंवा त्यांना शाल भेट केली जाते ! 
शाल ही पण एक अंगावर ओढायची चादरच आहे !

लौकीक आईवडील आपल्याला भोळेपणाने जन्म देतात, म्हणून त्यांना चंद्र म्हटले आहे. त्यामुळे आपण त्यांना, त्यांच्या मनाला चांगले वाटेल, अशा गोष्टी देतो. किंवा त्यांच्या मनाला आनंद होईल, असे वागतो बोलतो. ह्याला आपल्या लौकीक आईवडीलांना चंद्र देणे असे म्हणतात ! थोडक्यात म्हणजे, कलाकलाने गोडगोड बोलून, त्यांची मने सांभाळणे. रामचरित मानसात मनाविषयी आणि मनाच्या आरोग्याविषयी बरेच श्लोक आहेत. भारतियांनी जर रामचरितमानस वाचन कंपलसरी सुरु केले, तर भारतात एकही मनेरूघ्हण सापडणार नाही. सनातन बायोलॉजिकल शास्त्रानुसार, विश्वात प्रथम मन बनले. नंतर शरीर बनले. म्हणून. ज्याचे मनाचे आरोग्य ठिक, त्याचे शरीराचे आरोग्य देखील ठिक राहते.

' चंद्र सर्वत्र विद्यते ' म्हणजे, मन सर्वत्र असते आणि सर्वांमध्ये असते. देवी-देवतांपासून स्वर्ग पृथ्वी पाताळ सगळीकडे आणि सगळ्या लोकांकडे मन असते. परंतु, चतुरपणा सगळ्यांकडेच असेल असे नाही. किंवा भोळेपणा सगळ्यांकडे असेलच असेही नाही. भोळेपणा अखेरीस पश्चातापमध्ये बदलतो, किंवा विकारांमध्ये कन्व्हर्ट होतो. ही एक मोठी घसरगुंडी असते ! 

अशी घसरगुंडी आपल्या आई-वडिलांची, आपल्या लौकिक आईवडिलांची, किंवा आपली स्वतःची होऊ नये, म्हणून आपण गुरुकडे जातो. गुरु आपल्याला चद्दर देतो. म्हणजे आपल्याला विस्डम, कॉमनसेन्स, चतुरपणा, बुद्धिमत्ता, ज्ञान देणारी नाडी हे सर्व आपल्याला उपलब्ध करून देत असतो. त्याच्यामुळे आपली, सतत होणारी घसरगुंडी थांबते आणि आपला जन्मोजन्मी होणारा पश्चाताप देखील थांबतो. आणि त्यामुळे हळूहळू आपल्याला शांती प्राप्त होत असते. शांतीप्राप्त झाल्यावर, मनाचे स्थैर्य उपलब्ध होते. आणि मनाच्या स्थैर्यासोबत, आनंद आणि सौख्य उपलब्ध होऊ लागतात.


# चंद्र सर्वत्र विद्यते ! मात्र, चद्दर दुर्लभ असते ! 
# mind based Vs intelligence based life.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

भीक आणि भिऊ !

भीक म्हणजे काय ? ' ई ' म्हणजे, ऊर्जा . ऊर्जेचे अनेक प्रकार माणसाने बनवलेले आहेत. त्यापैकी ज्या ऊर्जा पॉझिटिव्ह आहेत, पोषक आहेत, उत...

एकूण पृष्ठदृश्ये :