प्रत्येक जिवंत व्यक्ती, मग ती श्रीमंत असो वा गरीब असो, मालक असो वा नोकर असो, श्वासोच्छवास घेतो. त्याप्रमाणे, दिसायला सुखवस्तु दिसत असला तरी, दुखती नस प्रत्येकाला असते. मग ती व्यक्ती, आपली स्वतःची दुखती नस, प्रकट करो अथवा लपवून ठेवो.
कोणती ब्रिथिंग टेकनिक कोणत्या वेळी वापरावी ?
कोणती ब्रिथिंग टेकनिक कोणत्या वेळी वापरावी ? हा लॉजिक, विसडम, इंटेलिजेन्स आणि कॉमनसेन्स वापरून घ्यावा लागणारा इंडिव्हिज्युअल कॉल आहे.
विकार, वासना, व्यसन, दुर्गंध, अज्ञान, निगेटिव्हिटी, दारिद्र्य, दुःख, रोग, अस्वच्छता, लबाडी या गोष्टी मारल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी ' सोहम टेक्निक ' वापरायला पाहिजे.
जे सनातन नैसर्गिक प्रवाह आहेत. त्यांना मारून चालणार नाही, त्यांना कौशल्याने हॅण्डल करावे लागते. त्यासाठी ' हाँन्गसो टेक्निक ' वापरायला पाहिजे. कारण, सनातन नैसर्गिक प्रवाहांना अडथळा करून किंवा त्यांना मारून काहीही उपयोग नसतो. जसे, हार्मोनल चेंजेंस, शरीराची नैसर्गिक वाढ होणे, झाडाची पानाफुलांची वाढ होणे, ही एक सनातन नैसर्गिक प्रक्रिया आहे. नद्यांच्या पाण्याचे गुरुत्वाकर्षणानुसार वाहत जाणारे प्रवाह, जन्ममरणाचे चक्र, सृष्टीचे ऋतुचक्र, सूर्याचे उगवणे आणि मावळणे यासारख्या घटना, ब्रह्मचर्यआश्रम, गृहस्थआश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम यासारखे मनुष्याच्या वयानुसार स्वीकारले जाणारे आश्रम, इ. इ.
' ओ ' म्हणजे, हाका मारणे, आरोळ्या मारणे, मागण्या करणे. पोट भरण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी, मागणी करणे.
' स ' म्हणजे, पवित्र करणे, परमात्म्यासारखे पवित्र करणे. आणि ' श ' म्हणजे, नष्ट करणे, किंवा मारून टाकणे.
' सोहम ' या शब्दाचा अर्थ होतो की, आपल्या मागण्या तसेच, आपले ' शरीराला हँडल करण्याचे कौशल्य ', हे परमात्म्यासारखे पवित्र असावे. पण, प्रॅक्टिकली ते शक्य आहे का ? केव्हातरी ते शक्य होते का? आपल्या पावित्र्याला आणि शक्तीला, आपण परमात्म्याशी कंपेअर नाही करू शकत.
आपल्याला पवित्र बोलण्याचे, पवित्र् चालण्याचे, पवित्र बघण्याचे, पवित्र वागण्या बोलण्याचे, सर्वांमध्ये मिसळून कामे करतांना व जिवन जगतांना पवित्रता सांभाळता येत नसेल, आपले लिमिट संपले की, आपण काय करतो ?
आपला ' सोहम ' च्या ऐवजी ' शोहम ' होऊन जातो !
आपल्या मानवी कालबद्ध शारीरीक बौद्धिक क्षमतेला लिमिटेशनस् असतात, त्यामुळे ते आपल्याला नेहमी पावित्र्य सांभाळणे शक्य होत नाही आणि पुंण्याच्या ऐवजी पाप होवून जाते. सत्कर्माच्या ऐवजी गुन्हा होऊन जातो. अश्या चुका आपल्याकडून होऊन नये, म्हणून महावतार बाबाजींनी सजेस्ट केलेली टेक्निक म्हणजे, ' हओंगसो टेक्निक ' होय.
आपल्या ' स ' ला किंवा आपल्या पावित्र्याला, आपण न मारता, केवळ कसबीपणाने हँडल करायला शिकणे.
आपल्या ' श ' ला, म्हणजे, आपल्या किलिंग पावरला कसबीपणाने हँडल करायला शिकणे.
आपल्या मागणीला नष्ट करण्याऐवजी, मारून टाकण्याऐवजी, हँडल करण्याची कला शिकणे.
जेव्हा तुम्ही हॉंगसो टेक्निक शिकतात, तेव्हा तुमच्याकडून, तुमच्या मानवी शरीराकडून, तुमच्या मानवी बुद्धीकडून, तुमच्या मानवी मनाकडून, हिंसक क्रिया होत नाही.
ज्यांची परिणीती क्रोधामध्ये होते, त्या क्रिया कमी कमी होत जातात. आणि तुमचे हँडलिंग करण्याचे स्किल वाढत जाते.
त्यामुळे तुमचे आयुष्य आणि तुमचे पुण्य वाढत जाते. तुमचे क्रोध आणि विकार नलिफाय होऊन जातात.
शोहम नाही हॉन्शो !
एकतर, ' शोहम ' नाही म्हणायला शिका ! किंवा सदय शोचा डायरेक्टर आणि प्रोड्युसर कोण आहे ? याचा शोध घेवून सावध व्हायला शिका !
तुम्ही कितीदा जरी प्रयत्न केला, तरी शो कधी थांबला आहे का ?
तुम्ही आज शो पूर्ण बंद केला. तरी कधी ना कधी, तो आपले तोंड बाहेर काढतोच ! हा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे ' डोन्ट स्टॉप द शो ! शो मस्ट गो ऑन ' असेच, मोठमोठ्या कार्तिक स्वामींना देखील, अपरिहार्यता किंवा बळजबरीने का असेना, पण म्हणावे लागले आहे.
कारण माणूस बळजबरीने शिकवून शिकत नाही, नॅचरल प्रोसेसमध्ये शिकतो ! हा देखील अनुभवाअंती आलेला निष्कर्ष आहे.
एकतर तुम्ही, शो न थांबवता, तिथून काढता पाय घेतला पाहिजे.
किंवा, तुम्हाला, तो ' शो ' आहे तसा, हॅण्डल करता आला पाहिजे.
हे दोनच पर्याय शिल्लक असतात.
प्रत्येक जबाबदारीला तुम्ही ' ओ श्युअर ' असे म्हणत स्विकारत असाल तर तुम्ही फसू देखील शकतात.
प्रत्येक जवाबदारीत तुम्ही ' हसो हसाओ और टाईमपसाओ ' करत असाल, तर तेही तुमच्या अडचणीचे संकटाचे कारण ठरू शकते.
काही नैसर्गिक प्रवाह बेकार जरी असले तरी अपरिहार्य असतात. अशावेळी तुम्ही त्या ' शो ' चा भाग बनुन ' शोहम ' म्हणाल का ? मीच हा ' शो ' आहे ! असे म्हणाल का ? मी ह्या ' शो ' चा प्रोड्युसर डारेक्टर आहे ! असे म्हणाल का ? नाही ना ?
मग तिथे तुम्हाला स्वतःच्या मनाशी ' हाँगन्शो ' म्हणत, तो ' शो ', व त्याचे कॅरॅक्टर डिरेक्टर फायनान्सर आहे तसे स्विकारून, एकतर तिथून निसटायचा पर्याय शोधावा लागेल, किंवा त्या शोमधील निर्लेप कॅरॅक्टर असलेला बाहुला जोकरसारखा ड्रामा करत, शोमधील सर्व पत्त्यांशी जुळवून घ्यावे लागेल.
हे ' हाँन्सो टेकनिकचे कौशल्य ', जर तुम्ही ' ओशो ' ' ओशो ' करत प्रत्येक ' शो ' मध्ये वापरत गेलात तर लोक तुम्हाला लिडर बनवून, तुमच्या मनात अंगात अहंकार लेपवून, तुम्हाला उंचावर चढवून, नंतर, जमिनीवर आपटू शकते.
त्यामुळे प्रत्येक शोमध्ये, आपण सक्रिय सहभाग घेण्याची तसेच जबाबदारी म्हणजे, ओनरशीप घेण्याची गरज नसते. त्या ' शो ' आणि त्याच्या किरदारांना हॉन्ग्शो देखील करत बसायचे नाही. डायरेक्ट ' इग्नोर आणि लेटगो ' करून टाकायचे.
शोमध्ये आपले-परके, मोहेमोहे-पोहेपोहे असे सगळेच आपले आवडते आकर्षक सवंगडी जरी असले तरी निर्णय आपला स्वतःचा इंडिव्हिज्युअलच मानला जातो. हे सर्व निर्णय घेता यावे, यासाठी स्वतःची बुद्धी तल्लख ठेवण्याची काळजी स्वतःच घ्यावी लागते. स्वतःचे खाण्यापिण्याचे, राहण्याचे, कामाचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात.
जरी तुम्ही गुलामगिरीत असाल, अडचणीत असाल, जेलमध्ये असाल, तुम्हाला, तुमच्या बोलण्याला, तुमच्या निर्णयाला कोणीच किंमत देत नसेल, तरी देखील स्वतःच्या श्वासाबरोबर, मनातल्या मनात ' हॉन्शो ' किंवा ' हाँन्सो ' अशा गुजगोष्टी करायला तुम्हाला कोणीही आडवू शकत नाही. घोर अज्ञान अंधकारात, किंवा गुलामगिरीत देखील, ते तुमचे परसनल ईनटीमेट स्वातंत्र्य तुम्हाला उपभोगता येणार आहे. तर प्रयत्न करायला काय हरकत आहे ? अदृश्य गुरुकृपेने, कदाचित तुम्ही, तुमच्या सर्वोपरी स्वातंत्र्याचे पूर्णत्व प्राप्त करू शकाल. सगळं काही स्वतःला सावरायसाठी आहे. शो हा नैसर्गिक प्रवाह असो वा अनैसर्गिक प्रवाह असो. कोणत्याच लिडरने सांगून तो कधीही थांबत नसतो.
' ऐप ' ची रिल ' फुल ' असते !
प्रत्येकाच्या मोबाईलच्या ॲपमध्ये रिल असतातच. पण,
तुमच्या रिलमध्ये ऐप पाहिजे ! कारण,
' ऐप ' म्हणजे, जर सरस्वतिचा वरदहस्त असलेले ध्यान करणारे हनुमान वानर मानले !
व,
' रील ' म्हणजे, जर लाईफफोर्स एनर्जी मानली.
तर,
प्राणशक्तीचा दाता, किंवा प्राणशक्तीला हँडल करणारा जो हनुमान आहे, त्याच्या जीवनशक्तीने, आणि प्राणशक्तीने भरपूर असलेली गोष्ट म्हणजे, एप्रिल !
जेव्हा तुम्ही रामधन भरपूर कमावतात, हनुमान ताकद भरपूर कमावतात, प्राणशक्ती भरपूर कमावतात, जीवनशक्ती भरपूर कमावतात, तेव्हा तुम्ही ' मालक ' बनतात. आणि, जे लोक असे करत नाहीत, ते ' नोकर ' बनतात. हे सांगण्यासाठी, ' एप्रिलफुल, डब्बाडूल, डब्बे में जोकर, तू मेरा नोकर ! ' असा वाक्प्रचार बनवलेला आहे.
' जोकर ' म्हणजे, जो केवळ डिमांड करतो. हाका मारतो. असा अर्थ गृहीत धरलेला आहे. किंवा जो केवळ भावल्यासारखा कॉमेडी एक्टिंग करतो. खरोखर काम करण्याचे पोटेन्शियल त्याच्यात नसते. त्यामुळे तो बांडगुळ असतो. इतरांवर निर्भर असतो. त्याला मालकाची गरज असते. कारण तो नोकर असतो.
कौशल्य शिक्षणाचे सार
हँडल करणे किंवा मारून टाकणे, हे दोन चॉईस जेव्हा तुमच्याकडे असतील. त्यावेळी कोणता चॉईस लीगली आणि मोरली अधिक योग्य आहे ? असा प्रश्न तुम्ही तुमच्याच मनाला विचारा !
हँडल करण्यासाठी कौशल्य लागते. आणि त्याची टेक्निक शिकावी लागते. आगेला हँडल करणे सोपे आहे का ? ऍटोमिक बॉम्बला हँडल करणं सोपं आहे का ? बिलकुल नाही ! प्रवाही पंचतत्त्वांना हँडल करणे देखील, सोपे नाही. परंतु, ते शिकणे गरजेचे आहे. जीवन जगण्यासाठी, जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला जर काही कौशल्य शिकायचे असेल, तर ते स्वतःला आणि इतरांना हँडल करणे !
हे ते ' कौशल्य शिक्षणाचे सार ' होय.
पूर्ण आयुष्य जरी निघून गेले तरी चालेल, पण शेवटी तुम्हाला स्वतःहून हँडल करणे जमलेच पाहिजे. कारण की, त्यामुळे तुमचे पुढचे जन्मोजन्मीचे संकटे टळणार आहेत.
मारून टाकणे सोपे असते. एका क्षणामध्ये मारून टाकता येतं. एका क्षणामध्ये नष्ट करता येतं. परंतु, तो एक गुन्हा ठरतो.
खाऊन टाकणे सोपे आहे. परंतु ते अन्न उगवण्यासाठी अनेक वर्ष लागून जातात. आणि अनेको अनेक महिने लागून जातात ! हे आपण जाणतोच. त्यामुळे, मारून टाकणे, हा अत्यंत कर्मदारिद्र्यपणा आणि कौशल्यविरहितपणा आहे.
जिवनात अज्ञान, अंधकार असल्याने आणि शिक्षण नसल्यामुळे, कौशल्य अंगी नसल्यामुळे, बुद्धिमत्ता विकसित न झाल्यामुळे, आपण ह्या गोष्टीला जवळ करतो !
हे जेव्हा सर्वांना कळेल, तेव्हा अहिंसेचे पोस्टर लावायची गरज राहणार नाही.
प्रत्येकालाच नॅचरली ह्या गोष्टी समजू लागतील.
कुणाचाही अपमान न करता, तसेच स्वतःलाही कमी न लेखता, जिवन जगता आले पाहिजे.
स्वतः निराश न होता किंवा इतरांना निराश न करता, जिवन जगता आले पाहिजे.
स्वतःला न मारता किंवा इतरांना न मारता केवळ कसबीपणाने, कौशल्याने, प्रसन्नतेने हॅण्डल करता आले पाहिजे.
हे आपल्याला ठाऊक आहे. पण ते साध्य करण्यासाठी कोणती टेकनिक आहे ? ते आपल्याला माहित नसते. ती ' हॉन्ग्सो टेकनिक ' आहे.